‘मी या नात्याला कधीच स्विकारणार नसून, त्यांना आशिर्वादही देणार नाही’- केसर मथारू

0
1836

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – ‘बिग बॉस’च्या बाराव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. जोडीदार या थीमसह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘भजन सम्राट’ अनूप जलोटा यांची. जेव्हापासून अनूप जलोटा यांनी शोमध्ये एंट्री घेतली आहे तेव्हापासून सोशल मीडियावर फक्त त्यांची आणि त्यांच्या प्रेयसीची चर्चा सुरु आहे. दोघांमध्ये जवळपास ३७ वर्षाचे अंतर आहे. दरम्यान रोज चर्चा होणाऱ्या या नव्या जोडीबद्दल अजून एक खुलासा समोर आला आहे.

जस्लीन मथारूच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांनी मुलाखत दिली असून त्यांनी काही खुलासे केल आहेत. केसर मथारु यांनी त्यांनी जेव्हा अनूप जलोटा आणि जस्लीनने त्यांच्या नात्याचा खुलासा केला, तेव्हा आपल्याला आणि कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला असे सांगितले. ‘मी या नात्याला कधीच स्विकारु शकत नाही. मी कधीच त्यांना आशिर्वाद देणार न नाही, आणि त्यांच्यापासून दोन हात लांब राहणेच पसंत करेन’, अशी प्रतीक्रिया केसर मथारु यांनी दिली आहे.

केसर मथारु यांनी सांगितले की, ‘तीन ते चार वर्षांपूर्वी गाणे सुधारण्यासाठी आपणच जस्लीनची भेट अनूप जलोटांशी घडवून दिली होती. त्यांच्यात काहीतरी सुरु आहे याची मला किंवा कुटुंबाला साधी कल्पनाही नव्हती’.

पुढे त्यांनी सांगितले आहे की, ‘मला सांगण्यात आले होते की दोघे गुरु आणि शिष्या म्हणून बिग बॉसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच सांगितले नव्हते. जेव्हा कार्यक्रमात त्यांच्या नात्याची घोषणा झाली तेव्हा माझा आणि कुटुंबाचा विश्वासच बसत नव्हता’.