Maharashtra

मी भाजपमध्ये जात आहे, हे माध्यमांनी सांगणे म्हणजे वेडेपणाच – विश्वजित कदम

By PCB Author

May 29, 2019

सांगली, दि. २९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी-काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. आता काँग्रेस नेते व आमदार  विश्वजित कदम भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’या वृत्तवाहिनेने दिले होते.  पण हे वृत्त विश्वजित कदम यांनी फेटाळून लावले आहे.

मी काँग्रेस विचारांचा एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ राहिल. माझा भाजपाशी काहीही संबंध नाही, असा खुलासा विश्वजित कदम यांनी केला आहे. मी भाजपमध्ये जात आहे, हे माध्यमांनी सांगणे म्हणजे वेडेपणाच आहे. मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे विश्वजित यांनी  स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विश्वजित कदम यांना याअगोदरही भाजपने खुली ऑफर दिली होती. मात्र, त्यावेळीही त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे तीन आमदार भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.