Maharashtra

मी भजन गातो, म्हणजे साधू-संत नाही – अनुप जलोटा  

By PCB Author

September 18, 2018

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – मी भजन गात आहे, म्हणजे साधू-संत असेल, असे लोकांना वाटत असेल. मात्र, तसे काही नाही. मी खूप मस्तीखोर असून  जीवनात आनंद उपभोगणारा, आयुष्य जगताना मज्जा करणारा आणि मनमुराद आनंद लुटणारा आहे.  हे सर्व ‘बिग बॉस’मध्ये तुम्हाला दिसून येईल, असे भजनसम्राट अनुप जलोटा यांनी म्हटले आहे.

६५ वर्षीय अनूप जलोटा यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारु ही त्यांच्यापेक्षा तब्बल ३७ वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या नात्यासंबंधी सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत मी वयाने खूप मोठा आहे. परंतु, विचाराने त्यांच्यापेक्षा तरुण आहे. लोकांना वाटत  आहे की, मी भजन गात आहे, म्हणजे साधू-संत असेल. परंतु,  तसे काही आजिबात नाही. मी आयुष्यात मज्जा करत आहे, असे ते म्हणाले.

बिग बॉस शोमध्ये येण्याआधी तीन वर्षापासून मी अनूप जलोटा यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.  याविषयी माझ्या आई-वडिलांना माहिती नाही, अशी कबुली जसलीन हिने  दिली आहे. तर जसलीनसोबत रिलेशनशीपमध्ये येण्याआधी अनूप जलोटा यांचे तीन लग्न झालेले आहेत.