Maharashtra

मी पवारांशी बोलल्याने कोणकोणाला पोटशूळ उठला आहे, हे मला माहिती आहे – संजय राऊत

By PCB Author

November 05, 2019

मुंबई, दि.५ (पीसीबी) – शरद पवार यांच्याशी बोलण्यात गैर काय आहे. होय, मी त्यांच्या संपर्कात आहे. शरद पवार यांना राज्यात कशाला बोलविता.

शरद पवार यांच्याशी कोण-कोण बोलतय हे मला माहिती आहे. कोणकोणाला पोटशूळ उठला आहे, हे आम्हाला माहिती आहे. शरद पवार केंद्रातील मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल. आमची भूमिकाही वेट अँड वॉचची आहे. दिल्लीचे प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही. राज्यातला निर्णय राज्यातच होईल. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच व्हावा. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे अशी भूमिका शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांचीही आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः आम्हाला राज्यपालांकडे पाठविले. शिवसेनेची भूमिका स्पष्ट करावी असे त्यांनी सांगितले होते. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

तर, संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून सतत भाजपवर टीका करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदावर सतत दावा करण्यात येत असल्याने अद्याप भाजप-शिवसेनेत चर्चा झालेली नाही. संजय राऊत यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.