मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेेब ठाकरे आहे

0
376

मुंबई,दि.२४(पीसीबी) – मी शिवसेनाप्रमुखांचा हात हातात घेऊन जी शपथ घेतली. तो त्यांचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर बसवण्याची घेतली आहे. ही जबाबदारी मी जरुर स्वीकारली. ज्यावेळी आपल्या तेव्हाच्या मित्रपक्षाने दिलेलं वचन मोडलं. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत त्या मंदिरात दिलेला शब्द खाली पाडला. असं काही ठरलंच नव्हतं म्हणून मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी नुसता उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणारा नाही लढणारा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये वचनपूर्ती सोहळ्यात बोलत होते.

कुटुंबप्रमुख म्हटल्यावर मी जे बोललो ते बोललो. तुमच्यासमोर त्यांनी मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला काय तोंड दाखवलं असतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.