‘मी टू’ मोहीम; ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप

0
835

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – देशभरात सध्या सुरु असलेल्या #metoo   मोहिमेअंतर्गत निष्ठा जैन या महिलेने ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप फेसबुकच्या माध्यमातून केले आहेत.२९ वर्षापूर्वी विनोद दुआ यांनी लैंगिक शोषण केल्याचे यात म्हटले आहे.

१९८९मध्ये मी ‘जनवाणी’ या चॅनेलमध्ये नोकरीच्या  मुलाखतीसाठी गेले होते. यावेळी विनोद दुआ  यांच्या केबिनमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मुलाखत घेण्याऐवजी अश्लील विनोद करण्यास सुरुवात  केली.

त्यानंतर त्यांनी मला वेतनाची अपेक्षा विचारली. मी ५ हजार रुपये असं सांगितल्यानंतर ते प्रचंड संतापले आणि माझी लायकी आहे का  ? असा प्रश्न विचारला. त्यांचे हे वक्तव्य प्रचंड अपमानास्पद होते. खरंतर असा अपमान मी पहिल्यांदाच सहन करत होते’, असे निष्ठा म्हणाल्या.