“मी टीकेचा धनी होईन, महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायची माझी तयारी आहे”

0
329

मुंबई,दि.१९(पीसीबी) – मी टीकेचा धनी होईन, महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायची माझी तयारी आहे, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

युद्ध शस्त्राने लढतात, पण या युद्धात शस्त्र नाहीये. सोशल डिस्टन्सिंग हेच शस्त्र आहे. आपल्याकडे याचे काहीही उत्तर नाही, फक्त अंतर ठेवणं एवढंच उत्तर आहे. काहीजण म्हणतात की यांच्याकडे काहीच उत्तर नाही. फक्त लॉकडाऊन… लॉकडाऊन… पण जगात कुणाकडेच काहीच उत्तर नाही. मी टीकेचा धनी होईन. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला माझी तयारी आहे. पण जे जे मला पटत ते महाराष्ट्राच्या हिताचं मी करणार म्हणजे करणारच, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या सरकारला ६ महिने होत आहेत. नवीन सरकार असताना नवीन स्वप्ने आहेत. अर्थसंकल्प जाहीर केला, त्यात नवीन गोष्टी जाहीर केल्या आणि अंमलबजावणीला सुरुवात करण्याच्या आधीच आपल्याला या संकटाला सामोरे जावे लागते. आपल्या सगळ्या योजना आहेत, त्या आपण कोणत्याही परिस्थितीत अंमलात आणणारच, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.