“मी जास्त कांदा, लसूण खात नाही – निर्मला सीतारमन

0
492

महाराष्ट्र, दि.५ (पीसीबी) –  ससंदेच्या सुरू असलेल्या सत्रात बुधवारी पुन्हा एकदा कांद्याच्या दरवाढीवर चर्चा करण्यात आली. देशभरात कांद्याच्या किंमतीनं शंभरी गाठली आहे. तर सतत वाढत जाणारे कांद्याचे दर हे सरकारसाठीही चिंतेचा विषय ठरत आहेत. अशातच संसदेत चर्चेदरम्यान कांद्याच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल करण्यात आला. यावर निर्मला सीतारमन यांनी आपले कुटुंबीय कांदा, लसूणसारखे पदार्थ जास्त खात नसल्याचे अजब स्पष्टीकरण दिले.

सीतारमन यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. “मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही,” असे त्या बोलताना म्हणाल्या. कांदा दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचली असल्याचेही त्यांनी नमूद केले.