मी जसा आहे तसाच दाखवतो, मला अभिनय करणं जमत नाही – रोहित पवार

0
376

बुलडाणा,दि.१८(पीसीबी) – ‘मी जसा आहे तसाच दाखवतो. माझा स्वभाव वेगळा आहे. मला अभिनय करणं जमत नाही. राजकारणात जे नाटक करतात ते फार दिवस टिकत नाहीत, हे माझं मत आहे’ असे कर्जत-जामखेडे मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी म्हणाले आहे. बुलडाणा येथील एका युवा संवाद कार्यक्रमात रोहित पवार बोलत होते.

“कितीही मोठे झालात तरी अहंकार येऊ देऊ नका. अहंकार आला तर दिल्ली आणि महाष्ट्रसारखं होतं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोमणा मारला. अहंकारावर नम्रता, लोकहिताचे निर्णय, लोकसंवादाचा विजय होतो हे आपण नुकतंच पाहिलंय”, असं ते म्हणाले.

‘सरकार कुठलही असलं तरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजेत. सर्वांच्या अपेक्षा सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. याबाबत माझ अजिबात दुमत नाही. दोन सरकारांमधला फरक इतकाच आहे की, हे सरकार आपलं सरकार आहे आणि ते सरकार ‘पुन्हा येईल, पुन्हा येईल’ म्हणणारं त्यांचं सरकार आहे’ असा टोमणाही रोहित पवार यांनी मारला.