मी जन्मभर तुमचा ऋणी राहिन; जितेंद्र आव्हाड यांचं भावुक ट्विट

0
772

मुंबई,दि.२९(पीसीबी) – महाविकास आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे, यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे ३६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. राष्ट्रवादीचे १३ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असून जितेंद्र आव्हाड यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी एक भावूक पोस्ट केली आहे.

ज्यांनी जन्म दिला ते आई-बाबा ,ज्यांनी राजकारणात बोटाला धरून चालवल ते शरद पवार साहेब, ज्यांच्या वागण्यात डोळ्यात करूणा, माया, प्रेम आपलेपणा दिसला त्या प्रतिभाकाकी आणी ज्यांनी साथ दिली ते असंख्य कार्यकर्ते आणि महाराष्ट्रतील माझे सर्व समर्थक मनापासून आभार, विरोधकांचे ही आभार, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड पोस्टच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत. त्यांनी सामान्य कार्यकर्ता ते विरोधक या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार दिसत आहेत.