मी गर्भवती होती तेव्हा गायीसारखी दिसत होते- करिना कपूर

0
421

मुंबई, दि. १६ (पीसीबी)-  जेव्हा अभिनेत्री करिना कपूर प्रेग्नंट होती आणि तैमूरचा जन्म व्हायचा होता, तेव्हा ती खूप चर्चेत होती. तिने आपले गर्भारपण कसे स्टायलिस्ट पद्धतीने कॅरी केले यावर तिचे फॅन्स फिदा होते. या दरम्यान तिने रॅम्प वॉकही केला होता. आता हेच सगळे अनुभव प्रेग्नंट असलेली कल्की केकलाही घेत आहे. काय म्हणाली करिना कल्कीचा बेबी बंप पाहून?..

कल्की आपल्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. Guy Hershberg या तिच्या बॉयफ्रेंडपासून ती गरोदर आहे. अलीकडेच ती करिनाच्या चॅट शोमध्ये पाहुणी म्हणून गेली होती. या चॅट शो दरम्यानची बातचीत अद्याप समोर आलेली नाही. पण दोघींमधले एक अनौपचारिक बोलणे समोर आलं आहे.

या व्हिडिओत करिनाने जेव्हा कल्कीचा बेबी बंप पाहिला तेव्हा ती म्हणाली, ‘तुझे पोट किती लहान वाटते आहे.’ त्यावर कल्कीने सांगितले की तिला सहा महिने झाले आहे. यावर करिना म्हणाले, ‘मी सहा महिन्यांची गर्भवती होती तेव्हा एखाद्या गायीसारखी दिसत होती.’ यावर दोघी खळखळून हसू लागल्या.