मी काही पाकिस्तानातून आलेलो नाही; चंद्रकांत पाटलांचे राज ठाकरेंना उत्तर

0
479

पुणे, दि. १९ (पीसीबी) – मी पुण्यातून पदवीधर मतदारसंघाचा दोन वेळा आमदार होतो. त्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. माझ्या उमेदवारीवरुन खूप चर्चा सुरु आहे.  पण मी काही पाकिस्तानातून आलेलो नाही, असे कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुण्यात आज (शनिवार) चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅली काढण्यात आली . यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी तसेच आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

कोथरुडमध्ये भाजपने बाहेरचा उमेदवार लादला कारण तुम्हाला गृहित धरले गेले आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापुरातील आहेत, तर ते कोल्हापूरमधून का उभे राहिले नाहीत? कोल्हापूरमध्ये उभे राहायला तुम्हाला भीती का वाटली?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोथरूडमधील सभेत केला होता. यावर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.