मी काय घरात गोट्या खेळतो काय ? – राज ठाकरे

0
1755

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – अमित ठाकरे यांनी राजकारणात सक्रीय होण्यासाठी कोणाकडून धडे घ्यावेत, असा प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला. यावर राज यांनी मी काय घरात गोट्या खेळतो काय, असा अभिनय करत आपल्या शैलीत उत्तर दिले. या सडेतोड उत्तरावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.    

एका  वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे  बोलत होते. त्यावेळी प्रेक्षकांमधून एकाने त्यांना अमित ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला. अमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय होत आहेत. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारण, समाजकारणाचे धडे घेतले आहेत. अमित यांनी कोणाकडून राजकारणाचे व समाजकारणाचे धडे घ्यावेत, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला.

या प्रश्नावर  राज यांनी  आपल्या खुमासदार शैलीत  मी घरात काय गोट्या खेळतो का ? असा प्रतिप्रश्न केला. त्यांच्या या उत्तरावर संपूर्ण सभागृहात हास्याचे कारंजे उडाले. राज ठाकरे खोचक प्रश्नांना अत्यंत मिश्किलपणे उत्तर देतात, हे अनेकदा दिसून आले आहे. या कार्यक्रमातही त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्यांच्यातील हजरजबाबीपणाची प्रचिती आली.