Maharashtra

मी उदयनराजेंना रिप्लेस करणार की नाही, याचा निर्णय शरद पवार घेतील – रामराजे निंबाळकर

By PCB Author

October 31, 2018

सातारा, दि. ३१ (पीसीबी) – मी उदयनराजेंना रिप्लेस करणार की नाही, याचा निर्णय पक्षाध्यक्ष   शरद पवार घेतील. खंडाळा माझाच तालुका  असल्याने  पक्षाने जबाबदारी दिली, तर  सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास आपण केव्हाही तयार आहे’, असे  विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, माझ्या डोक्‍यात खासदारकी नाही, मात्र पक्षाने जबाबदारी दिली तर  खासदारकीच्या रिंगणात केव्हाही उतरण्याची आपली तयारी आहे. मात्र, मी मूळ फलटणचा असून हा मतदारसंघ सातारा मतदारसंघात नाही. फलटण माढा मतदारसंघात येतो. परंतु साताऱ्यातून उमेदवारी करायला अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मी हाडाचा शिक्षक असल्याने मी लोकसभेत आवडीने काम करेल. खासदार उदयनराजे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी अनेक पिढ्यांपासून अतिशय मधूर संबंध आहेत, असेही  त्यांनी सांगितले.

मला अनेक विषयांचा अभ्यास करण्यात रस आहे. त्यामुळे मला विधानसभेपेक्षा वरच्या सभागृहात काम करायला आवडेल, असे, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आधीत सांगितले होते. माझा मतदारसंघ राखीव झाला. त्यानंतर पवार साहेबांनी मला राज्यात वरीष्ठ सभागृहात काम करण्याची संधी दिली, असे त्यांनी सांगितले.