Desh

मी आरएसएस चा माणूस; देशाची सेवा हेच माझे कर्तव्य- नितीन गडकरी

By PCB Author

March 01, 2019

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान असतील, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) माणूस असून देशसेवा हे माझे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तुम्ही आहात काय असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीसह विविध विषयांवर खुलेपणाने आपले मत व्यक्त केले. केंद्र सरकारने शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शेती आणि ऊर्जा क्षेत्रात विविधीकरण करणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले.

ते म्हणाले, नमामि गंगा या अभियानामुळे गंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आहे. हे मोदी सरकारच्या काळातच झाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. मोदी सरकारच्या काळात रस्त्यांची कामे वेगाने आणि मोठ्या प्रमाणात झाली आहेत. देशात रोजगार निर्मितीला पोषक वातावरण आहे. पण मला वाटते की लोकांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्या इतपत सक्षम झाले पाहिजे.