Maharashtra

मी आमदार असताना देवेंद्रभाई तुम्ही हाफ चड्डीत शाळेला जात होता – छगन भुजबळ

By PCB Author

April 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मी आमदार, मुंबईचा  महापौर असताना देवेंद्रभाई तुम्ही हाफ चड्डीत शाळेत जात होता,  आता तुम्हाला विचारुन मी भाषण करु का?, असा खोचक  सवाल  राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

श्रीगोंदा येथे आघाडीचे संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या  सभेत भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

भुजबळ पुढे म्हणाले की,  मी चूक नसतानाही मला तुरुंगात टाकण्यात आले.  आता मुख्यमंत्री मला धमकी देत आहेत.  भाजपवाल्यांनी यापूर्वी एका गांधीची हत्या केली होती. आता नगरमध्ये दुसऱ्या गांधीची हत्या  केली आहे. भाजपला अनेक मतदारसंघात उमेदवार मिळत  नव्हते,  म्हणून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील  लोकांना पळवून आणून  उमेदवारी दिली.  भाजप  ही पोरे पळवणारी टोळी  आहे. त्यांच्यापासून सावध राहा, असे भुजबळ म्हणाले.