‘मी अध्यात्मिक ठिकाणी भाषण करत नाही – धनंजय मुंडे

0
396

बीड, दि.१७ (पीसीबी) – बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना देवळाली ता. आष्टी येथे चैतन्य स्वामी यांच्या ४९व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास त्यांनी भेट दिली. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन चैतन्य स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी गावकऱ्यांनी मुंडे यांचे जोरदार स्वागत केले.

गावकऱ्यांच्या आग्रही निमंत्रणामुळे मला चैतन्य स्वामी यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे यावेळी मुंडे म्हणाले. ‘मी अध्यात्मिक ठिकाणी भाषण करत नाही, परंतु नुकतेच कीर्तन सम्पलेल्या लाड महाराजांनी आज्ञा केल्यामुळे मी माईक हातात घेतला; जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून, मंदिराच्या भिंतीवर ‘तुमचे दुःख मला द्या, माझ्या वाट्याचे सुख तुम्हाला देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन’, अशा शब्दात मुंडेंनी गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.