मीडियाला फक्त मीच कसा दिसतो ? – अजित पवार   

0
352

बीड, दि. २४ (पीसीबी) – राज्य सहकारी बँकेच्या  गैरव्यवहार प्रकरणी भाजप -शिवसेनेसह  ७५  नेत्यांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र,  मीडियाला  फक्त मीच कसा  दिसतो ?  असे राष्ट्रवादीचे नेते   अजित पवार यांनी म्हटले आहे.   

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा  परळीत दाखल झाली. या  यात्रेचे दुचाकी फेरीने  जल्लोषात  स्वागत करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, आपण राज्य सहकारी बँकेच्या अर्ज आणि कार्यकारी समितीच्या एकही बैठकीला उपस्थित नव्हतो.  न्यायालयाने  भाजप – शिवसेनेच्याही नेत्यांवर  गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, मीडियाला फक्त आपणच दिसतो,  असे सांगून आपण एक रुपचाही मिंधा नाही, असे त्यांनी सांगितले.