‘मीटू’चे वादळ सर्वोच्च न्यायालयाच्या दारात; सरन्यायाधीशांवर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप

0
621

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – ‘मीटू’चे वादळ सिनेसृष्टीत घोंघावत असतानाच आता हे वादळ सर्वोच्च न्यायालयाच्या दारापर्यंत पोहचले आहे. भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयातील एका माजी कर्मचारी महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

या महिलेने  २२ पानांच्या एका प्रतिज्ञापत्रावर आपली आपबिती  सर्वोच्च न्यायालयाच्या २२ न्यायाधीशांसमोर  मांडली आहे. संबंधित महिला कनिष्ठ न्यायालयात सहाय्यक म्हणून काम करत होती.  या  महिलेने  आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात  १० आणि ११ तारखेला  राहत्या घरातील कार्यालयात आपले  लैंगिक शोषण केले.

रंजन गोगोई यांनी मला जवळ  घेत  माझ्या संपूर्ण शरीराला नकोसे स्पर्श केले. मला घट्ट पकडून गैरवर्तन केले. मी स्वत:ची सुटका करुन बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मला सोडले नाही,  असे या महिलेने म्हटले आहे.

दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या एका ई-मेलमध्ये ‘हे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.  न्याय संस्थेला बदनाम करण्याचा हा  डाव आहे. हे एक मोठे षडयंत्र आहे, असा दावा करून त्यांनी  गोगोई यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.