“मीटरला परवानगी दिली, म्हणजे रिक्षाचालकांच्या सर्वच प्रश्नावरून माघार घेतली असे नाही”: बाबा कांबळे

0
324

‘स्मार्ट सिटी मध्ये मेट्रो बिआरटीशी रिक्षाचालकांना जोडून त्यांनाही स्मार्ट सिटीत प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करणार’ : राहुल कलाटे

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहर नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असून स्मार्ट सिटी योजनेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला आहे, अशातच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शहरातील गुन्हेगारी बेकायदेशीर धंदे याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करून पोलिसांबद्दल आदरयुक्त धाक निर्माण केला आहे यामुळे पोलिस प्रशासन आणि कायद्याबद्दल आदर निर्माण झाला असून शहर सुरळीत होत असताना शहरांमध्ये मीटरने रिक्षा सुरू व्हाव्यात अशी मागणी प्रशासनाने वतीने आयुक्त कृष्ण प्रकाश , उपयुक्त सुधिर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले यांनी बैठक घेऊन केले आहे.

या बाबत आम्ही होकार दिला असून पिंपरी-चिंचवड शहरात मीटरने रिक्षा सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. परंतु रिक्षाचालकांचे इतर जे प्रश्न आहेत त्यामध्ये नविन रिक्षा स्टँडला मान्यता मिळणे, शेअर रिक्षा ने प्रवास, रिक्षाचालकांवर ऑनलाइन खटले भरले जात असून याबद्दल ऑनलाईन खटले भरले जाऊ नये, बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करावी, मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, रिक्षाचालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, फायनान्स कंपनीच्या गुंडा कडून होणारे बेकायदेशीर वसुली बाबत कारवाई करण्यात यावी. कोरोना काळातील रिक्षा बंद म्हणून रिक्षाचालकांना आर्थिक सहकार्य मिळावे, आदी विविध मागण्या रिक्षा चालक करत असून या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत,’ असे बाबा कांबळे म्हणाले.

यावेळी नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक मयूर कलाटे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष सोमनाथ कलाटे, रिक्षा ब्रिगेडचे बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र वाहतूक पंचायतचे सदाशिव तळेकर, सुरेंद्र जाधव, मोहन काटे, विजय ढगारे, संजय दौंडकर, धनंजय कुदळे, नवनाथ जोगदंड, भागवत मामा उजने, आदी उपस्थित होते,

यावेळी नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो पीएमपीएमएल या व्यवस्थेमध्ये नागरिकांना प्रवासी सेवा दिली जाते, यात रिक्षा चालक देखील प्रवासी सेवा देत असून त्यांचे योगदान मोठे आहे, यामुळे या यंत्रणेशी रिक्षाचालकाना जोडले गेले पाहिजे रिक्षा चालक देखील प्रवासी व्यवस्थेचा अंतर्गक्त भाग झाला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करू, ” मी आश्वासन देत नाही जास्त बोलत नाही परंतु करून दाखवतो असा माझा इतिहास आहे असे राहुल कलाटे म्हणाले,

मयूर कलाटे म्हणाले रिक्षा स्टँडवर पानपोई, वाचनालय सुरु व्हावे यासाठी मी सर्वतोपरी मदत करून हे रिक्षा स्टँड शहरातील आदर्श रिक्षा स्टँड म्हणून पुढे यावे यासाठी प्रयत्न करू परंतु नागरिकांच्या देखील तक्रार येऊ नये असाही प्रयत्न रिक्षाचालकांनी करावा असे मयूर कलाटे म्हणाले,

या वेळी तिरंगा रिक्षा स्टँड चे उद्घाटन राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तिरंगा रिक्षा स्टँडचे अध्यक्ष तुकाराम देवरे, उपाध्यक्ष दिनेश कांबळे, कार्याध्यक्ष जाफर शेख, खजिनदार गणेश गाढवे, सेक्रेटरी इरफान सय्यद, सचिव संजय वाघमारे, राजेंद्र मस्के, अनिल शिंदे, भारत गुंडकर, गणपत कांबळे,प्रकाश शिंदे, सिद्धार्थ साबळे, प्रदीप अय्यर, रवींद्र सरगडे, प्रकाश कुंभार, दत्ता राजे, दयानंद वाघमारे, अफसर सय्यद, अनिल शिरसाट, जावेद सय्यद, ज्ञानेश्वर विटकर, योगेश शिंदे, अक्षय बनसोडे, परमेश्वर सूर्यवंशी, आकाश लिंबळे, दिगंबर सोनवणे यांनी परिश्रम घेतले.