Pune

मिस्टर, मिस अँड मिसेस फॅशन स्पर्धेचे २९ सप्टेंबरला पुण्यात आयोजन

By PCB Author

September 18, 2019

पुणे, दि. १८ (पीसीबी) – एस स्क्वेअर मीडिया अँड पब्लिसिटी आयोजित मिस्टर, मिस अँड मिसेस फॅशन परफेक्ट २०१९ या स्पर्धेचे २९ सप्टेंबर रोजी   पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी  सहभाग घेण्याचे आवाहन  आयोजक उद्धव खरड यांनी केले आहे .

फॅशन परफेक्ट २०१९  ही एक आगळी वेगळी स्पर्धा असून स्पर्धे मुळे स्पर्धकांना आपले टॅलेंट दाखवण्यासाठी स्टेज मिळून नवीन नवीन गोष्टी अनुभवायची संधी देखील प्राप्त होणार  आहे. अनेक स्पर्धकांना शॉर्ट फिल्म ,वेब सिरीज , अल्बमसाँग तसेच मालिकां मध्ये काम मिळण्याची संधी देखील निर्माण होऊ शकते .

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी यूएस स्क्वेअर मीडिया अँड पब्लिसिटी शी (८७९६२४९६२५, ७८८७९१९१९१) संपर्क साधण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. या  स्पर्धेच्या आयोजनात अक्षय खिरीड, श्वेता गायकवाड , ऋजुता काटे, माधुरी गोडांबे, महेंद्र बोरकर व सुनील आहेर यांचे सहकार्य लाभले आहे .