‘मिस्टर आणि मिसेस बेस्ट आयकॉन २०१८’ या स्पर्धेसाठी शनिवारी पुण्यात ऑडिशन

0
761

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – ‘रूद्रा इव्हेंट’च्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘मिस्टर आणि मिसेस बेस्ट आयकॉन २०१८’ या स्पर्धेसाठी  शनिवारी (दि.२७)  कोरेगांव पार्क येथील मगशॉट लाँन्ज येथे ऑडिशन घेण्यात येणार आहे. तर रविवारी (दि.२८) फर्ग्युसन रोडवरील मायरा लाँन्ज येथे ऑडिशन होणार आहे.

या स्पर्धेतून निवड झालेल्या स्पर्धकांचे तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच फोटोशूट घेण्यात येणार आहे. तर अंतिम फेरी १७ नोव्हेंबररोजी पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला मानाचा बेस्ट आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यावेळी मॉडेल, अभिनेते, अभिनेत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी सागर सोनावणे (८७९३३३७८९७) जुनेद नायक (+९१७७७४९५८०८०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.