Pimpri

‘मिळकत कर बिलातील शास्तीची रक्कम १०० टक्के माफ करा’; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी

By PCB Author

January 19, 2021

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मिळकत कर बिलामधील महापालिका शास्तीची (विलंब दंड) १०० टक्के रक्कम माफ करण्याची मागणी केली आहे . त्यासाठी तसे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अवैध बांधकामावरील शास्तीकर वगळून मूळ मालमत्ताकराचा भरणा स्वीकृत करण्यास ‘विशेष बाब’ म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेस मान्यता दिली आहे

संजोग वाघेरे यांनी निवेदनातून अशी मागणी केली आहे कि, ‘गेली अनेक वर्ष शास्तीकरामुळे नागरिक कर भर नव्हते. परंतु, आता मूळ कर स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे नागरिक मूळकर भरण्यास तयार आहेत. मात्र, मिळकत करांमध्ये महापालिका शास्तीची रक्कम देखील काही प्रमाणात आहे. त्यासाठी महापालिका शास्तीकर (विलंब दंड) १०० टक्के माफ करुन नागरिकांना दिलासा द्यावा.’