मिझोरामचे मुख्यमंत्री पुललथनहवला यांचा पराभव ; काँग्रेसला धक्का

0
830

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – मिझोरम विधानसभेच्या ४० जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री पु ललथनहवला यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मिझोराम मध्ये गेल्या १० वर्षापासून काँग्रेस सत्तेवर होती. हाती आलेल्या निकालानुसार, मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंट अर्थात एमएनएफ सत्ता काबिज करू शकते.  

मिझोरम ४० जागांसाठी २८ नोव्हेंबरला मतदान झाले होते. येथे १० वर्षांपासून काँग्रेस सत्तेत आहे. मुख्यमंत्री ललथनहवला तीन वेळा मुख्यमंत्री बनलेले आहेत. २०१३ मध्ये काँग्रेसने ३४ जागा जिंकल्या होत्या. यावेळी विधानसभा अध्यक्षांसह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.