माहेरहून ५ लाख आणण्यासाठी पिंपरीतील विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

1077

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी सासरी नांदत असलेल्या एका ३० वर्षीय विवाहितेला शिवीगाळ करत घरातून हाकलून सासरकडच्या मंडळींनी जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पिंपरी गावातील वाघेरे कॉलनी येथे घडली.

याप्रकरणी पीडित ३० वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात सासरकडच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वागीश विश्वंभर स्वामी, वर्षा विश्वंभर स्वामी, विद्या राहुल कमाने, वनिता विश्वंभर स्वामी (सर्व रा. शिवनद सोसायटी, वाघेरे कॉलनी, पिंपरी) आणि गणेश स्वामी (रा. अंबेजोगाई, जि.बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे २०१२ मध्ये वागीश स्वामी याच्यासोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर त्या पिंपरी येथील माहेरी रहायला आल्या. महिनाभर कसेबसे नांदवून सासरकडच्या मंडळींनी पीडितेकडे वारंवार माहेरहून ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला. तसेच २०१४ मध्ये नांदवायला नकार देऊन घरातून हाकलून दिले. आणि शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने पिंपरी पोलिस ठाण्यात सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यानुसार स्वामी कुटूंबीयांवर गुन्हा दाखल केला. पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निमगीरे तपास करत आहेत.