Desh

मास्क वापरला नाही तर १०,००० दंड

By PCB Author

July 06, 2020

तिरुवनंतपुरम, दि. ६ (पीसीबी) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील एक वर्ष म्हणजे जुलै 2021 पर्यंत केरळ सरकारने निर्बंध अधिक कठोर केले आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य असेल. त्या सोबत जर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार, असंही करेळ सरकारने नव्या नियमात सांगितले आहे. कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापरावा लागेल. त्यासोबत प्रत्येक ठिकाणी 6 फूट अंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागेल.

लग्न समारंभात 50 लोकं सहभागी होऊ शकतात. त्यासोबत अंतयात्रेत फक्त 20 लोकं सहभागी होऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सभा, गेट-टुगेदर, जुलूस, धरणे आंदोलनं किंवा इतर कार्यक्रम सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय आयोजित केले जाऊ शकत नाही. त्यासोबत अशा प्रकारच्या कार्यक्रमात फक्त 10 लोकं सहभागी होऊ शकतात. त्यापेक्षा जास्त लोकं सहभागी होऊ शकत नाही. दुकानं आणि इतर व्यावसायिक आस्थापनामध्ये एकावेळी 20 पेक्षा अधिक ग्राहक नसावे. त्यासोबत सर्व ग्राहकांना 6 फूट सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार. तसेच सार्वजनिक ठिकाणी, रस्ते किंवा फुटपाथवर थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.