Pimpri

मास्क न वापरणाऱ्या 286 जणांवर कारवाई

By PCB Author

March 24, 2021

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. 23) मास्क न वापरल्या प्रकरणी 286 जणांवर कारवाई केली. शहरात कोरोनाचा उद्रेक होत असताना नागरिक मात्र नियमांचे उल्लंघन करताना आढळत आहेत. अशा बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे.

मंगळवारी पिंपरी चिंचवड शहरात 1 हजार 519 नवीन रुग्ण आढळून आले. तर 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. तसेच नियमभंग करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई देखील केली जात आहे.

मंगळवारी पोलिसांनी केलेली विनामास्कची कारवाई –

एमआयडीसी भोसरी (33), भोसरी (25), पिंपरी (00), चिंचवड (16), निगडी (11), आळंदी (33), चाकण (16), दिघी (19), सांगवी (22), वाकड (00), हिंजवडी (08), देहूरोड (11), तळेगाव दाभाडे (00), तळेगाव एमआयडीसी (02), चिखली (30), रावेत चौकी (17), शिरगाव चौकी (22), म्हाळुंगे चौकी (21)