मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अखिलेशकुमार निगम पोलीस निवडणूक निरीक्षक

0
606

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदार संघासाठी अखिलेशकुमार निगम यांची पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अखिलेशकुमार यांचे पुणे येथे आगमन झाले असून व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-302येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. 

त्यांचा मोबाईल क्रमांक ८२७५९६९५११, दूरध्वनी क्रमांक ०२०-२६३३८०३३, फॅक्स् क्र.०२०-२६२२८१११ असा आहे. [email protected] हा त्यांचा ईमेल आयडी आहे.त्यांना मंगळवार आणि बुधवारी दुपारी ३ ते ५ या कालावधीत भेटता येईल, असे अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी,निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, पुणे यांनी कळविले आहे.