Notifications

मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

By PCB Author

March 22, 2019

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी (दि. २२) जाहीर केली. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार विरूद्ध श्रीरंग बारणे यांच्यात सामना रंगणार हे निश्चित आहे.