Notifications

मावळ मतदारसंघातून पार्थ पवार आणि शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

By PCB Author

March 15, 2019

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने शुक्रवारी (दि. १५) उमेदवार जाहीर केले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि शिरूर मतदारसंघात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात मावळ आणि शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवर मिळत नाहीत, असे चित्र निर्माण झाले होते. अनेकांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर आता अखेर दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीने आयात उमेदवार दिले आहेत.