मावळ आणि शिरूरचा निकाल ऐकायला जाताय…वाहतूक व्यवस्था कशी असेल वाचा…

0
752

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी स्टेडीयम येथे गुरुवारी (दि. २३) सकाळी सात वाजल्यापासून सुरू होत आहे. मतमोजणीच्या दिवशी बालेवाडी स्टेडियमकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत पहाटेपासूनच बदल करण्यात येणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची थांबण्याची आणि पार्कींगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

वाहतुक व्यवस्थेत करण्यात आलेले बदल आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांची थांबण्याची आणि पार्कींगची व्यवस्था पुढील प्रमाणे असेल…

@ म्हाळुंगे पोलिस चौकी येथून म्हाळुंगे गावाकडे जाण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी साडेपाच ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांनी चौकी समोरील रस्त्याचा वापर करुन म्हाळुंगे गावात जाण्यासाठी अथवा इच्छित स्थळी जाण्यासाठी वापर करावा.

@ म्हाळुंगे पोलिस चौकी ते राजमाता जिजाऊ चौक दरम्यानच्या रस्त्यावर शिवसेना व भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आली असून या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी वाहन पार्कींग आणि थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

@ म्हाळुंगे स्टेडीयम गेटमधून निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीटिकल एजंट आणि निवडणुक मतमोजणी संदर्भात खाजगी कामगारा यांना सकाळी ७ वाजेपर्यंत त्याच्याकडील प्रवेश पत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे.

@ स्टेडीयमच्या वेटलिफ्टींग हॉलच्या डावे बाजूस राजकीय प्रतिनीधी यांचे चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी राखीव पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे.

@ निवडणुक मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि निवडणुक मतमोजनी संबंधीत खाजगी कामगार यांच्यासाठी स्टेडीयमच्या मुख्य बाजूच्या समोरील जागेत पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.

@ बालेवाडी स्टेडीयम गेट क्र. ४ च्या समोर मोकळ्या जागेत वंचित आघाडी व इतर अपक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी राखीव जागा ठेवण्यात आली आहे. तसेच या ठिकाणीच त्यांची थांबण्याची व वाहनांच्या पार्कींची सोय करण्यात आली आहे.

@ हॉटेल हॉलीडे इन च्या पाठीमागील बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी थांबण्याची आणि वाहन पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.

@ राधा चौक ते म्हाळुंगे पोलीस चौकी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्कींग आणि नो-हॉल्टींग झोन करण्यात आला आहे.

@ राधा चौक ते हॉटे हॉलीडे इन दरम्यानच्या सेवा रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्कींग आणि नो-हॉल्टींग झोन करण्यात आला आहे.