मावळात ३० ते ४० नागरीकांना सार्वजनिक कार्यक्रमात विषबाधा; काहींची प्रकृती गंभीर

0
540

पवनानगर, दि.१९ (पीसीबी) : मावळ तालुक्यातील भडवली गावात गुरुवार (दि.१८) रोजी सार्वजनिक कार्यक्रम झाला. त्यात ग्रामस्थांसाठी जेवनाची सोय करण्यात आली होती. त्यातुन ३० ते ४० नागरीकांना विषबाधा (फुड पॉझनिंग) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पवन मावळ परिसरातील भडवली गावात हा प्रकार घडला असुन बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालय काले पवनानगर येथे तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमातून विष बाधा झाली आहे. त्यामध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

यामध्ये ६ ते ७ लहान मुलांचा समावेष आहे. रुग्णालयातील तीनही वार्ड फुल झाले असुन काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय अधिक्षक डॉ इंद्रनिल पाटील य‍ांच्या मार्गदर्शनाखाली डॉ वर्षा पाटील,डॉ. विश्वंभर सोनवणे, डॉ पोपट आधाते, डॉ शिवराज वाघमारे रुग्णांचे उपचार करत आहे.या ठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलिस व वडगाव मावळचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.

डॉ. वर्षा पाटील ग्रामीण रुग्णालय काले – पवनानगर – सकाळी अचानक आम्हाला भडवली गावातून फोन आला की, अन्नातून नागरिकांना विष बाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी अब्युलन्सद्वारे रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे, चक्कर येणे, मळमळ होणे अश्या प्रकारची लक्षणे दिसुन आली आहेत. साधारणतः रुग्णालयात २८ ते ३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये ५ ते ६ पेशंटची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना औंध हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील सर्व बेड फुल झाले आहेत. त्यामुळे काही रुग्णांना ग्रामीण रुग्णलाय कान्हे फाटा येथे पाठवण्यात आले आहे. तर रुग्णालयातील बाधित रुग्णांमध्ये ३ ते ४ लहान मुलांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच अजूनही काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच आणखी रुग्ण असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे त्यांना देखील ग्रामीण रुग्णालय कान्हे फाटा येथे पाठविण्यात आले आहे.