मावळात चॉकलेटचे आमिष दाखवून आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

0
835

मावळ, दि. १८ (पीसीबी) – चॉकलेटचे आमिष दाखवून एका इसमाने आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि. ३१) रात्री आठच्या सुमारास मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार एका राजस्थानी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाहनगाव येथे बिगारी काम करतात. शुक्रवारी (दि.३१ ऑगस्ट) रात्री  आठच्या सुमारास आरोपीने वाहनगाव येथील इंद्रधनुष्य फार्म येथे चिमुरडीला चॉकलेट देण्याचे अमिश दाखवून बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या पालकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावर पालकांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी मूळ राजस्थान येथील असून तो कामासाठी मावळ परिसरात आला होता. घटनेनंतर तो पसार झाला आहे. वडगाव मावळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.