मावळातील ब्राह्मणोली गावात टोळक्यांकडून सात वाहनांची तोडफोड; २० जणांवर गुन्हा

0
1162

मावळ, दि. २७ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून मावळातील  ब्राह्मणोली गावात १५ ते २० जणांच्या टोळक्यांनी दगडफेक करत गावातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करुन मोठे नुकसान केले. या घटनेमध्ये काही नागरिक देखील जखमी झाले असून जखमिंमध्ये महिलांचा देखील समावेश आहे.  ही घटना सोमवारी (दि.२६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी वंदना शांताराम काळे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सागर शांताराम काळे, अनिकेत कांताराम काळे, हनुमंत रामु काळे, बाबुराव शहाजी काळे, अक्षय कांताराम काळे यांच्यासह त्यांची १० ते १५ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वंदना काळे यांची ब्राह्मणोली गावातील पवनाधरणाच्या कडेला भात शेती आहे. या धरणाच्या शेजारीच काही गावातील गावगुंडांनी टेंन्ट साईट सुरु केली आहे. या टेंन्ट साईटवर शनिवारी आणि रविवारी हे दोन दिवस प्रचंड गरदी असते. येथे बहुतांश आयटी पार्क आणि बाहेर गावाहून आलेले पर्यठक फिरायला येतात. त्यामुळे मोठा मोबदला टेंन्ट मालकांना मिळतो. मात्र या टेंन्ट साईटवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने आरोपींनी वंदना यांच्या भात शेतातून रस्ता काढला होता. यामुळे वंदना काळे यांच्या कुटूंबात आणि आरोपींमध्ये या आदि देखील वाद झाला होता. या वादातूनच सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपींनी वंदना काळे यांच्या कुटूंबावर हल्ला चडवत दगडफेक करुन जखमी केले.

दरम्यान आरोपीने उभा केलेले टेंन्ट आणि फिर्यादी हे भात शेती करत असलेली जागा हे दोन्ही पाटबंधारे विभागाची जागा आहे. मात्र केवळ वहिवाटावर नाव असल्याने आरोपी आणि फिर्यादी त्या जागेवर हक्क दाखवत आहेत. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.