मावळमधून नवख्याला उमेदवारी मिळाल्यास सांभाळून घ्या – अजित पवार    

0
528

नवी मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातून नवख्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली, तर त्याला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे.

नवी मुंबईमध्ये अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चत असल्याचे संकेत त्यांनी दिले.

अजित पवार म्हणाले की, पक्षाने तरुणांना संधी देण्याचा विचार केला आहे. उद्या पक्ष कोण उमेदवार देतो, याचा निर्णय यायचा आहे. कदाचित उमेदवार नवखाही येण्याची शक्यता आहे. जर नवखा आला तर त्याला सांभाळून घ्या, अनुभवी आला तर प्रश्नच नाही. या गोष्टीचा विचार सर्व सहकाऱ्यांनी करावा, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.