मावळची सत्ता रेव्हे पार्ट्यांसाठी असणार काय?; प्रकाश आबेडकरांचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांवर टीकास्त्र

0
602

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – आम्ही कोणाचे गुलाम नाही, अजित पवारांचे तर मुळीच नाही हे मावळ लोकसभा मतदारसंघाला दाखवून द्यायचे आहे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी मावळ मतदारसंघातील मतदारांना केले आहे. मावळमध्ये चॉकलेट पर्व सुरु असून चॉकलेट कोणाला दिले त्याचे चारित्र्य काय? उद्याची सत्ता रेव्ह पार्ट्या करण्यासाठी असणार आहे काय? व्यसनाधीनांच्या हाती सत्ता देणार आहात का? असा प्रश्न करीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.