मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचे पंतप्रधान मोदींकडून समर्थन

0
303

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने वादाला तोंड फुटले असताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीचे स्पष्ट शब्दांत समर्थन केले आहे. साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जो वाद निर्माण केला जात आहे, तो काँग्रेसला महागात पडेल, असा इशाराच पंतप्रधान मोदी यांनी मुलाखतीतून दिला.