Chinchwad

मारुंजी गावातील दगडखाणीत मृतदेह आढळल्याने खळबळ

By PCB Author

October 02, 2018

हिंजवडी, दि. २ (पीसीबी) – हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील मारुंजी गावात असलेल्या दगडखाणीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृताची अद्याप ओळख पटूशकलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज हिंजवडी पोलिसांना मारुंजी गावातील दगडखाणीत एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी अंदाजे ४०-४५ वर्षीय पुरुष वर्णनाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच हा घातपात आहे कि आत्महत्या हे अद्याप समजू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.