Chinchwad

मारुंजीत बांधकाम मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

January 23, 2019

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – एका बांधकाम साईटवर मजुरीचे काम करणाऱ्या तरुणाने राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि.२२) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील मारुंजी येथे घडली.

सीमंतो लेट (वय २२, रा. लेबर कँम्प, कोलते पाटील यांची बांधकाम साईट, मारुंजी. मुळ रा. पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमंतो हा बांधकाम मजुर म्हणून मारुंजी येथील कोलते पाटील या बांधकाम साईटवर कामास होता. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तो घरीच होता. त्याने लुंगीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमंतोचे मित्र त्याला जेवण करण्यासाठी बोलवण्यासाठी गेले असता त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या मित्रांच्या निद्रशनास आले. घटनेची माहिती हिंजवडी पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सीमंतोचा मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केला. मात्र उपचारापूर्वीचा त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. सीमंतोने आत्महत्या का केली हे अद्याप समजु शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.