Chinchwad

मारुंजीत घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञातांनी पेटवली

By PCB Author

June 19, 2019

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी पेटवून देत नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. १८) पहाटे मारुंजीगाव येथे घडली.

गजानन काशीराम सुरळकर (वय २३, रा. मारुंजीगाव, हिंजवडी) याने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मारुंजीगाव येथे लाईफ रिपब्लिक सोसायटीच्या मागे चव्हाण मळ्यात राहतो. त्याने त्याची दुचाकी (एमएच/१४/एचए/०३९२) सोमवारी रात्री घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञातांनी त्याची दुचाकी पेटवून देत नुकसान केले. हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.