मायावती, योगी आदिनाथ यांना निवडणूक आयोगाचा दणका ; उमेदवारांचा प्रचार करण्यास बंदी  

0
538

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. योगी आदित्यनाथ यांना ७२ तासांसाठी तर मायावती यांना ४८ तासांसाठी प्रचारबंदी करण्यात आली आहे.

योगींना पुढील  तीन दिवस तर मायावती यांना दोन दिवस आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करता येणार नाही. मंगळवारी (दि. १६ ) सकाळी सहा वाजल्यापासून ही प्रचारबंदी अंमलात येणार आहे. भाषणाच्यावेळी दोन्ही नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह  विधान केले होते. याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

मायावती यांच्या भाषणामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असे मत निवडणूक आयोगाने नोंदवले आहे.  पुढील  ४८ तास मायावतींवर सभा, रोड शो आणि मुलाखती देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.  तर मेरठ येथील सभेत आदित्यनाथ यांनी केलेल्या अली आणि बजरंग बली वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.