Desh

  मायावती पंतप्रधानपदाच्या दावेदार असतील; काँग्रेस नेत्याचा दावा

By PCB Author

January 22, 2019

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय होईल. बसपाच्या प्रमुख  मायावती या पंतप्रधान पदाच्या दावेदार असतील, असे सांगून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी   पंतप्रधान नसतील, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी केला आहे.  

त्याचबरोबर आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये  दुपटीने वाढ होऊन  ८८ ते ९० पर्यंतच  मजल मारता येईल, असेही त्यांनी  म्हटले आहे. अलवर येथील रामगड विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर नटवर सिंह यांचा मुलगा जगत सिंह निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर नटवर सिंह बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, महाआघाडी होणार, हे कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या सभेवरून  सिद्ध झाले आहे. तीन राज्यातील पराभवानानंतर मोदींची प्रतिमा ढासळली आहे. राज्याचे नेतृत्व करणे वेगळे आणि देशाचे नेतृत्व करणे वेगळे असते, असा टोलाही त्यांनी मोदींना यावेळी लगावला.