मायावतींचा बसपा सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष; बँकांमध्ये ६६९ कोटी जमा

0
355

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – बँक खात्यांमधील शिलकीच्या बाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षानं (बसप) अन्य सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना मागं टाकलंय. बसपनं निवडणूक आयोगाला २५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार, एनसीआरमधील सरकारी बँकांच्या एकूण आठ खात्यांमध्ये पक्षाचे तब्बल ६६९ कोटी रुपये जमा आहेत.