माफी मागण्याच्या बहाण्याने महिलेची गैरवर्तन

0
347

पिंपळे निलख, दि. २३ (पीसीबी) – जुन्या कारणांवरून झालेल्या वादाबाबत माफी मागण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच फोनवर महिलेला आणि तिच्या पतीला शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेचा कसा पोहोचतो, अशी देखील धमकी दिली. ही घटना 6 जून 2019 रोजी पिंपळे निलख येथे घडली.

पीडित महिलेने दोन वर्षानंतर 22 सप्टेंबर 2021 रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यनुसार रोहन अजित भालेराव (वय 42, रा. बाणेर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती आणि आरोपी यांची बांधकाम व्यवसायाची पार्टनरशिप आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊ नये असे त्यांच्या पतीने आरोपीला सांगितले होते. तरीही आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. मागील प्रकारणांवरून माफी मागण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन केले.

त्यानंतर महिलेच्या पतीला फोन करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. ‘तुमचा मुलगा अमेरिकेला कसा पोहोचतो मी पाहतो, अशी आरोपीने धमकी दिली आणि फोनवर अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.