मान्सून केरळ मध्ये दाखल

0
216

पिंपरी, दि. 4 (पीसीबी): आपल्या नियोजित वेळेनुसार मान्सून केरळ मध्ये दाखल झाल्यानंतर आता त्याने कर्नाटकातील कारवार पर्यत मजल मारली आहे. मान्सूनची अशीच वाटचाल राहीली तर येत्या रविवारपर्यत कर्नाटक व तामिळनाडूच्या आणखी काही भागात तो दाखल होईल, असे हवामान खात्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

अरबी समुद्रात असलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे वाऱ्यांना खेचून आणल्याने मान्सून नियमित वेळेवर म्हणजे एक जून रोजी केरळ मध्ये दाखल झाला. मान्सूनने सोमवारी केरळच्या कन्नूर तामिळनाडूच्या कोईमतूर कन्याकुमारी पर्यतचा भाग व्यापला होता.
चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना किनारपट्टी लगत मान्सूनने आणखी वाटचाल केली. गुरूवारी केरळ कोमोरिनचा सर्व भाग दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी भाग कर्नाटकसह आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.