मात्र डोक्यावर हेल्मेट असेल तर अपघातातून जीव सुखरुप वाचू शकतो; असाच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

0
449

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – रस्त्यावर होणारे अपघात हे कोणत्याही देशात नवीन नाहीत. दुचाकीस्वार अनेकदा घाई करत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत असल्याच्या घटना घडतात. अशाप्रकारचे अपघात अनेकदा जीवावर बेतणारेही असतात. मात्र डोक्यावर हेल्मेट असेल तर अपघातातून जीव सुखरुप वाचू शकतो. असाच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दहा सेकंदात दुचाकीस्वाराने दोनदा मृत्यूला चकवा दिला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ कधीचा आणि कोणाचा आहे? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, व्हिडीओ पाहिल्यानंतर दुचाकी चालवत असताना हेल्मट वापरण्याचे महत्व नक्कीच समजेल.

 

११ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये वेगाने जाणारा दुचाकीस्वार एका कारला धडकतो. कारला धडकल्यामुळे तो घसरत दुरपर्यंत जाऊन पडतो. बाईक एकीकडे आणि तो दुसरीकडे पडलेला दिसतोय. या अपघातातून तो कसाबसा सावरून उठून आपली बाईक उचलण्यासाठी जातो. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेला पोल त्याच्या डोक्यावर पडतो. त्यातूनही तो सुखरूप बचावलेला दिसतो. कारण त्याच्या डोक्यावर हेल्मेट असते.