मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – सुनिल  शेळके

0
1217

तळेगांव, दि १७ (पीसीबी) –   मावळ विधानसभा मतदारसंघातील मातंग समाजाच्या प्रश्नासाठी शर्तीचे प्रयत्न करणार राज्यशासनाकडे ज्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांसाठी अथक परिश्रम घेऊन, लहुजी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या प्रलंबित शिफारशी राज्यशासनाकडे लागू झाल्या नाहीत, त्या सर्व शिफारशी लागू करण्यासाठी कटिबद्ध राहणार. तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच बार्टी प्रमाणे आर्टी स्थापन करून अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेला आश्वासनाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार, असे सुनिल अण्णा शेळके यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मनोज कांबळे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर माऊली , संत तुकाराम महाराज, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील केंद्रभागी असलेल्या मावळ मतदारसंघातून सुनील (अण्णा ) शेळके यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी मातंग समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाची रान करेल, या भूमीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे, वासुदेव बळवंत फडके,चाफेकर बंधू त्यांच्या स्वतंत्र संग्रामाचा इतिहास पाहिला आहे.  भारतमातेला आपल्या बलिदानाची रक्ताची रांगोळी घालून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, अशा सर्व महामानवाच्या विचारांचा वारसा घेऊन, सामाजिक कार्याची वाटचाल करणाऱ्या सुनील (अण्णा) शेळके प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आज सर्वजण कटिबद्ध झाले आहेत.

आपल्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या व मित्र पक्षाचे उमेदवार सुनील अण्णा शेळके यांना निवडून देण्यासाठी पूर्ण मतदारसंघांमध्ये आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोनियाजी गांधी लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी, आणि मावळातून आघाडीचा एक उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते कटिबद्ध राहतील.

गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने मातंग समाजाचा भ्रमनिरास केला आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सवासाठीज मंजूर झालेल्या 100 कोटी निधीचाही अपवय सुरू असल्यासारखी दिसत आहे. मातंग समाजाच्या अ ब क ड आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मागणीसाठी गेले पाच वर्ष अनेक आंदोलन समाजाच्या विविध संघटनांनी व समाज बांधवांनी प्रयत्न केले. परंतु त्याची दखल या सरकारने घेतली नाही, तसेच भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा मातंग समाजाच्या मागण्यांना बेदखल करण्यात आलेले आहे .

हा सरकारचा ढोंगीपणा नाकर्तेपणा कार्यकर्त्यांनी ओळखले असून याठिकाणी मातंग समाज एकसंघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मागे उभारण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करून गेले , अनेक दिवस प्रयत्न सुरू आहेत.आणि याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येत आहे. सरकारच्या ढोंगीपणाचा समाजाला लक्षात येत आहे. खोटं बोला पण रेटून बोला अशी नीती या समाजासाठी सरकारने अवलंबले आहे. फक्त तकलादू निर्णय जाहीर करायचे मात्र अंमलबजावणी करताना हात आखडता घ्यायचा अशी सरकारची भूमिका गेले पाच वर्षे राहिले आहे. त्यामुळे मातंग समाजाने आता एकसंधपणे आघाडीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आता वातावरण फिरलय आणि मातंग समाजाचा ठरलंय भारतीय जनता पार्टीला यावेळी घरी बसवण्यासाठी प्रयत्न करायचं,

याप्रसंगी प्राध्यापक धनंजय भिसे, किशोर खंडागळे,सुनील जी भिसे, संतोष ससाने,बापू लोकरे, बाळासाहेब पाटोळे,राकेश रणदिवे, सुरज बाविस्कर,युवराज चखाले, विलास लोंढे, हरिदास भालके, राम अडागळे, कैलास लोंढे, अमित कांबळे, दत्ता कांबळे, अभिजीत लोंढे,आदी या बैठकीला बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.