माण येथे जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला केली जबर मारहाण

0
938

मुळशी, दि. १२ (पीसीबी) – वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सख्या मोठ्या भावाने लहान भावाला जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि.११) सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास पारखीवस्ती अपंगशाळेजवळ, माण येथे घडली.

दिलीप लक्ष्मण पारखी असे मारहाण झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दिलीप यांचे मोठे भाऊ राजेंद्र लक्ष्मण पारखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास जखमी दिलीप आणि त्यांची पत्नी हे त्यांच्या घराशेजारी राहाणाऱ्या महिलेसोबत बोलत थांबले होते. यावेळी दिलीप यांचा सख्खा मोठा भाऊ राजेंद्र तेथे आला आणि वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून  त्याने लहान भाऊ दिलीप याला शिवीगाळ करुन सायकलीच्या चैनने डोक्यावर, चेहऱ्यावर आणि कानावर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी राजेंद्रवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. हिंजवजी पोलीस अधिक तपास करत आहेत.