‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’, यामुळे जलसंधारणाची कामे रखडली – मुख्यमंत्री

0
761

पुणे, दि. १२ (पीसीबी) – ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची अशी घोषणा देण्यात आली होती. त्यातून जलसंधारणाची कामे करण्याची अपेक्षा होती. मात्र, गावागावात इतके गट-तट, धर्म-जात यामुळे ‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’ त्याचे असे झाले. गावातील या कुरघोड्यांमुळे गावाचा विकास रखडला असून    लोकचळवळीशिवाय जलसंधारणाचे काम होऊ शकत नाही. परंतु गावागावांतील गट-तट, जात-पात आणि पक्षांमुळे लोकचळवळ उभी राहत नाही. हीच गोष्ट पानी फाऊंडेशनने हेरून आणि त्यावर काम सुरू केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) पानी फौडेंशनच्या कामाच्या कौतुक केले.