Maharashtra

माढ्यात शरद पवारांना सर्व ताकदीनीशी सहकार्य करणार – नितेश राणे

By PCB Author

February 25, 2019

करमाळा , दि. २५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत  कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही.  अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांचे नाव पंतप्रधान पदासाठी येत असेल, तर  सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. माढा लोकसभा  मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या पवारांना  स्वाभिमानी पक्ष  सर्व ताकदीनीशी सहकार्य करेल, असे आमदार नीतेश राणे यांनी येथे सांगितले.   

वांगी (ता. करमाळा) येथे  एका कार्यक्रमासाठी राणे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

राणे म्हणाले की,  माढा मतदारसंघात  ज्या- ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाची ताकद आहे,  तिथे  त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही  प्रयत्न  करणार आहोत. पवार ज्येष्ठ नेते  असून पंतप्रधानपदाच्या  शर्यतीमध्ये आहेत. जर आपला माणूस पंतप्रधान होत असेल, तर आपण सहकार्य केले पाहिजे. भाजप-शिवसेनेची युती झाली, तर स्वाभिमानी पक्ष त्यांच्यासोबत नसेल, असे आधीच आम्ही स्पष्ट केली आहे.  त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात आमचे उमेदवार लोकसभेला रिंगणात असतील, असेही त्यांनी सांगितले.